Eknath Shinde Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

कॅमेरे नेता येतील तिथेच आम्ही जातो; CM शिंदेंचा अजित पवारांना नाव न घेता टोला

जे काही आहे ते आम्ही बाहेरच, उघडपणे करतो, असंही शिंदे स्पष्टपणे म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी दौऱ्यांचा आणि विकासकामांचा धडाकाच लावला आहे. दररोज दौरे, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी गणेशोत्सवाच्या काळात अधिकच प्रमाणात वाढलेल्या दिसतायत. त्यावरुन आता ते विरोधकांच्या नजरेतही येऊ लागलेत. याच दौऱ्यांवरुन अजित पवारांनी केलेल्या टीकेला आता शिंदेंनी उत्तर दिलं आहे. (Eknath Shinde on Ajit Pawar)

विकासकामं, दौरे, कार्यकर्त्यांच्या घरच्या भेटी या सगळ्यादरम्यानचे एकनाथ शिंदेंचे फोटो सातत्याने व्हायरल होत होते. या व्हायरल फोटोवरुन विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी त्यांना चांगलंच सुनावलं होतं. आम्हीही कामं करतो, पण सगळीकडे कॅमेरे घेऊन फोटो काढत नाही, अशा आशयाचा टोला अजित पवारांनी लगावला होता. त्यालाच आता मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिंदेंनी यावर भाष्य केलं आहे. आम्ही स्वतः फोटो काढत नाही, जनता फोटो काढते आणि ते व्हायरल करते. तसंच आम्ही आमच्यासोबत कॅमेरे नेतो, कॅमेरे जिथे नेता येतील, तिथेच आम्ही जातो, असा टोला त्यांनी अजित पवारांना नाव न घेता लगावला आहे. तसंच आपलं आतून बाहेर काही करत नाही, जे काही आहे ते बाहेरच उघडपणे करतो, असंही शिंदे स्पष्टपणे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली; 'युरोसिस्टायटीस' नावाचा गंभीर आजार! तीन दिवसांपासून सलाईनवर, कारागृहातच...

Nagpur News: नागपुरात सीबीआयकडून तीन विद्यार्थ्यांची चौकशी;पुण्यात मोटेगावकरच्या मुलाचीही चौकशी

Kokan: खरीप हंगामावर एल निनोचं सावट, कृषी विभागाचा इशारा; योग्य वाण निवडा अन् सिंचन योजनेचा लाभ घ्या

ॲनिमलनंतर बॉबी देओल साकारणार बंदर ! सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Nashik News: देशी गायींच्या संवर्धनासाठी शासनाची 'लाडकी गाय योजना'; महिन्याला १,५०० रुपये, संकरित गायींना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान

SCROLL FOR NEXT