cm Eknath Shinde Opposition parties alliance in lok sabha election 2024 political news  esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde : ...२०१९ मध्ये पालापाचोळ्यासारखे उडून गेले!; CM शिंंदेंची विरोधकांच्या एकजुटीवर खोचक टीका

रोहित कणसे

नवीन संसद भवन इमारतीचे आज, २८ मे रोजी उद्घाटन करण्यात आलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्यात आला होता. उद्घाटन कार्यक्रमावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या दरम्यान विरोधकांनी नवीन संसद भवन इमारतीच्या उद्घटनाच्या कार्यक्रमावर टाकलेला हा बहिष्कार हा दुर्दैवी असल्याचे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, या कार्यक्रमासाठी सगळ्यांना निमंत्रण पाठवलं होतं, तेथे सगळे होते. सर्व जातीपाती-धर्माचे लोक कार्यक्रमाला होते. कोणालाही डावलण्यात आलं नाही. पण कावीळ झालेल्या लोकांना सगळं पिवळं दिसतं. आजच्या या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहीजे होतं पण दुर्देव आहे असे शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

देशात लोकशाही टिकवायची असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं असे आवाहन उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला.

यावर बोलताना शिंदे म्हणाले की, "लोकशाहीचं हे पवित्र मंदिर आहे. लोकशाही टिकवायची असेल तर त्यांनी सहभागी व्हायला हवं होतं. सगळे एकत्र? २०१९ ला देखील सगळे एकत्र आले होते. पण पालापाचोळ्यासारखे उडून गेले. २०१४ पेक्षा २०१९ ला मोदी साहेबांच्या नेतृत्वात जास्तीच्या जागा आल्या. २०२४ ला देखील सगळे रेकॉर्ड मोडतील. १४० कोटी जनता मोदींच्या पाठिशी आहेत. २०२४ ला सगळे रेकॉर्ड मोडतील असे एकनाथ शिंदे म्हणाले."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT