CM Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : पक्षप्रवेश मुख्यमंत्री कार्यालयात कशाला? CM शिंदेंवर नेटकरी संतापले!

श्रीकांत शिंदेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो व्हायरल झाला होता, तेव्हाही अशीच चर्चा झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेतलं बंड, त्यानंतर झालेलं ऐतिहासिक सत्तांतर या सगळ्यानंतर गेल्या ४ ते ५ महिन्यांपासूनच एकनाथ शिंदेंची जोरदार चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत सत्ता स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतरचे त्यांचे निर्णय, दौरे, गाठीभेटी यांची अजूनही चर्चा होतेच आहे. पण आताचा हा विषय वेगळा आहे.

काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल होत होता. ज्यामध्ये एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले होते. त्यावरुन सोशल मीडियाच नाही तर विरोधी पक्षांनीही या दोघांना चांगलंच धारेवर धरलं होतं. अखेर श्रीकांत शिंदेंना पत्रकार परिषद घेऊन या विषयाचा सोक्षमोक्ष लावायला लागला होता. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे अशाच काहीशा विषयावरून चर्चेत आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी पालघरमधल्या काही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. याचे फोटो एकनाथ शिंदे यांनी स्वतः आपल्या ट्वीटरवरुन शेअर केले होते. या फोटोमध्ये या माणसांच्या मागे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री असा बोर्ड दिसत आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश मुख्यमंत्री कार्यालयात झाला का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. जर हे खरं असेल तर पक्षाचे असे खासगी कार्यक्रम सरकारी मुख्यमंत्री कार्यालयात कशाला?

नेटकऱ्यांनीही या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकास्त्र साधलं आहे. स्वतःच्या पक्षाचं कार्यालय नसल्याने असं करावं लागतंय, असं काही जणांचं म्हणणं आहे. तर काही जणांनी मुख्यमंत्री कार्यालयात पक्षाचे कार्यक्रम घेणं चूक आहे, असं मत मांडत या गोष्टीचा निषेध केला आहे. आता हा पक्षप्रवेश झाला ते नक्की मुख्यमंत्री कार्यालयच होतं का? जर तसं असेल तर अशा पद्धतीने सरकारी कार्यालयात पक्षाचा कार्यक्रम घेणं योग्य आहे का? अशा जनतेच्या प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच उत्तर द्यावं म्हणजे या चर्चांना पूर्णविराम लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT