CM Eknath Shinde News esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : ज्येष्ठांना मोफत देवदर्शन; मतदार आपल्याकडे ओढण्याचा CM शिंदेंचा नवा प्लॅन?

यापूर्वी गणेशोत्सवात त्यांनी छोट्या मोठ्या मंडळांना भेटी देत मतदारांना आकर्षून घेण्याचा प्रयत्न केला होता.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातला मोठा मतदार वर्ग आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्लॅन आखल्याची चर्चा आहे. एसटी महामंडळाच्या मदतीने ज्येष्ठांसाठी मोफत देवदर्शन सुविधा देण्याचं नियोजन सध्या सुरू आहे.

राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या एक कोटींच्या आसपास आहे. या ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन घडवून आणण्याचा विचार सध्या शिंदे सरकारचा सुरू आहे. प्रत्येक शनिवार-रविवारी ही सुविधा देण्यात येणार आहे.

यासाठी एसटी महामंडळानेही मदत कऱण्याची तयारी दर्शवली आहे. महामंडळाकडून दोन हजार एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातल्या प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारी ही सेवा असेल. ही सेवा देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात ते अगदी छोट्या मोठ्या गणपती मंडळांनाही भेटी देत होते. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांनी मतदार आपल्याकडे आकर्षून घेण्याचे प्रयत्न सुरू केले होते. आता मोफत तीर्थक्षेत्र प्रवास हे याचेच एक उदाहरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT