Eknath Shinde
Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र

EWS Reservation : "Tweet करणाऱ्याला काढून टाका"; आरक्षणाचं स्वागत करताच CM एकनाथ शिंदे ट्रोल

सकाळ डिजिटल टीम

आर्थिक दुर्बल घटकांना नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काल शिक्कामोर्तब झालं. सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरच्या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहेत.

काल सर्वोच्च न्यायालयाने १० टक्के आर्थिक आरक्षणावर निकाल दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचं स्वागत करत एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये शिंदे म्हणतात, "सर्वोच्च न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये आज जो निर्णय दिला आहे, त्याचे मी मनापासून स्वागत करतो. सर्व जाती-धर्मांतील गरीब आणि दुर्बल घटकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातला निर्णय हा गोरगरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे."

याच ट्वीटवरुन नेटकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. यामध्ये सर्व जाती धर्मांचा उल्लेख केला आहे, तो चुकीचा असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. हा निर्णय केवळ खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांनाच लागू होतो, असं सांगत काही जणांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. तर मुख्यमंत्र्यांनी पूर्ण निर्णय वाचला नाही. ओबीसी एससी एसटी एनटी यांना आर्थिक दृष्ट दुर्बल घटकांना आरक्षण मिळालेला आहे त्यातून आरक्षण घेता येणार नाही, असंही सांगितलं आहे. तर अनेकांनी राज्यातल्या पोलीस भरती, तसंच MPSC मधून पदं भरण्याची मागणीही सातत्याने लावून धरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT