Eknath Shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde Latest News : ''पर्याय नाही! एकनाथ शिंदेंना अपात्र व्हावंच लागणार'' विरोधी पक्षनेत्याने सांगितला नियम

Maharashtra Politics Update : शेड्यूल १० नुसार १६ आमदारांना अपात्र व्हावंच लागेल. एकनाथ शिंदेंचा त्यात समावेश असला तरी पर्याय नाही.

संतोष कानडे

Mumbai News : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातलं राजकारण वेगळ्या दिशेने जात असल्याचं दिसून येत आहे. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना नोटीस बजावली असून ठाकरे गटाच्या आमदारांनाही नोटीस धाडली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयने जे सांगितलं आहे त्यानुसार कारवाई सुरु आहे. शेड्यूल १० नुसार १६ आमदारांना अपात्र व्हावंच लागेल. एकनाथ शिंदेंचा त्यात समावेश असला तरी पर्याय नाही. विधीमंडळ पक्षाची व्याख्या न्यायालयाने केली असून शिंदेंच्या पक्षाचा गटप्रमुख न्यायालयाला मान्य नाही.

दानवे पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाईल की नाही, हे माहिती नाही. परंतु उद्धव ठाकरे यांनी नेमलेले प्रतोद सुनिल प्रभू हेच कायदेशीरदृष्ट्या योग्य आहेत. त्यामुळे त्यांचा व्हिप लागू होईल. आमदारांवर कारवाई होणार हे निश्चित आहे.

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनाच मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल, असं राजकीय जाणकार सांगत आहेत. नाहीतरी बंडानंतरच्या पहिल्या बैठकीत अजित पवारांनी किती दिवस उपमुख्यमंत्री रहाचयं, असं विधान करुन मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली होती. आज विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेली नोटीस शिंदे गटावर दबाव निर्माण करण्यासाठी नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT