Nagpur Winter Session esakal
महाराष्ट्र बातम्या

Nagpur Winter Session : सीमाप्रश्नावरून हिवाळी अधिवेशन गाजणार; CM शिंदे मांडणार ठराव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमाप्रश्नावर ठराव मांडणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमाप्रश्नावर ठराव मांडणार आहेत.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद (Karnataka-Maharashtra Border Dispute) आता चांगलाच पेटत चालला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं आहे. त्यातच आता महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यामुळंच नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गाजणार हे स्पष्ट झालंय.

कामकाज सल्लागार समितीची काल बैठक पार पडली. त्यात अधिवेशनाचा कार्यक्रम आणि कालावधी यावर शिक्कामोर्तब झालं. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावासीय मराठी जनतेच्या हितासाठी आणि राज्याच्या अखंडतेसाठी महाराष्ट्र सरकार कायमच पाठीशी असल्याचा ठराव मांडण्याची सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केली. त्यावर सर्वांनी संमती दर्शवली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमाप्रश्नावर ठराव मांडणार आहेत. त्याचप्रमाणे 21 विधेयके या अधिवेशनात मांडली जाणार आहेत. हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबर ते 30 डिसेंबर असे फक्त 12 दिवस चालणार आहे. दोन वर्षे कोरोनामुळं नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकलं नव्हतं. यंदाचं हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार आहे.

विधान भवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: मकोका गुन्ह्यातील फरार गुन्हेगारास डेक्कन चौपाटी परिसरातून अटक

सामंथा रुथ प्रभू झाली आई! चिमुकल्या लेकाची पहिली झलक दाखवत नावही केलं जाहीर

Kolhapur ZP News : कोल्हापूर जिल्हा परिषदेवर सहा स्वीकृत सदस्य; कोणाला किती जागा मिळणार?, इच्छुकांची मंदियाळी

Pune FDA Action : पुणे, कोल्हापूरसह 'या' 5 जिल्ह्यांत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! 2 लाख किलोहून अधिक भेसळयुक्त मिठाई अन् तूप जप्त; 111 दुकानांचे परवाने रद्द

R Ashwin: मोहम्मद सिराजला पहिल्या कसोटीत संधी न दिल्याने अश्विन नाराज; टीम इंडियातील स्थानाबाबत म्हणाला, 'हा तर फक्त ट्रेलर आहे'

SCROLL FOR NEXT