महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Accident : समृद्धीवर पुन्हा मृत्यूचं तांडव! १७ कामगारांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्याचे सखोल चौकशीचे आदेश

रोहित कणसे

समृद्धी महामार्गावरील पुलाचे काम सुरू असताना शहापूर येथे ग्रेडर व लाँचर (क्रेन) कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मंगळवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील पुलाचे काम सुरू असताना पुलावरूल गर्डरसह क्रेन कोसळून मोठा अपघात झाला. या घटनेत १७ कामगारांचा मृत्यू झाला असून ३ कामगार जखमी झाले आहेत.या जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की...

शहापूरजवळ समृद्धी एक्सप्रेसचं काम सुरू होतं, त्यावेळ गर्डर कोसळून १७ लोकांचा मृत्यू झाला. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. सर्व अधिकारी, पालकमंत्री आणि त्या खात्याचे मंत्रिदेखील घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरू आहे. स्वित्झरलँडची कंपनी या ठिकाणी काम करत होती. या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मृतांच्यानातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना झाला अपघात

शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत.

आज पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेची माहिती घेतली. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एनडीआरएफ चे पथक याठिकाणी पोहचले असून बचाव कार्य करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यास सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

दरम्यान या अपघातानंतर घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय क्षेत्रातुन शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देखील या अपघातत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाखांची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तर जखीमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोषातून दिली जाईल. तर राज्य सरकारकडून देखील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT