narayan rane, uddhav Thackeray sakal media
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री ठाकरे आणि राणेंनी एका विमानातून प्रवास करणं टाळलंय?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोकणवासियांसाठी महत्वाचा मानला जाणारा चिपी विमानतळाचा उद्घाटनाचा (chipi airport inauguration) सोहळा ९ सप्टेंबरला पार पडतो आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union minister Narayan rane), केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया उपस्थित राहणार आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंसोबत एका विमानातून प्रवास करण्याचं टाळल्याचं दिसून येत आहे.

शनिवारी चिपी विमानतळावर पहिलं विमान लँड होणार आहे. या विमानातून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रवास करणार आहेत. याच विमानाने मुख्यमंत्री येतील अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, तसे होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिलं विमान लँड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार विनायक राऊत तसेच शिवसेनेचे आणखी काही नेते खासगी विमानाने चिपी विमानतळावर दाखल होणार आहेत. दोन्ही नेत्यांनी एका विमानातून प्रवास करण्याचं टाळलं असलं, तरीही शेवटी दोघेही एकाच मंचावर येणार आहे. त्यामुळे या उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुपलेली पाहायला मिळाले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी 'चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे काय काम?' असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून देखील शिवसेना विरुद्ध राणे वॉर रंगला होता. आता शिवसेना आणि राणे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे उद्याचा सोहळा महत्वाचा मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT