Sharad-Pawar-Uddhav-Thackeray Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

दिल्लीला जाण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक

मुख्यमंत्री रविवारी केंद्रीय गृहमंत्रायलाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत.

सुधीर काकडे

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यात आज मुंबईत महत्वाची बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री रविवारी केंद्रीय गृहमंत्रायलाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार असून, नक्षलवादासारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ही बैठक सुरु आहे. या बैठकीसाठी शरद पवार मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले आहेत.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात डिजीटल शिक्षणाबद्दल बैठक आहे. या बैठकीत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, वर्षा गायकवाड आणि अधिकारी उपस्थित आहेत. डिजीटल शिक्षण आणि त्यासंदर्भातील बाबींसदर्भात चर्चा या बैठकीत होणार आहे. या बैठकीसोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात एक महत्वाची पारपडणार असल्याची माहिती मिळाली आहे. रविरावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला जाणार असून, राज्यातल्या परिस्थितीचा आढावा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमधील ही बैठक महत्वाची मानली जाते आहे.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच दिल्ली दौऱ्याबद्दल माहिती मिळाली होती. नक्षलवाद आणि माओवादाविरोधात केंद्र सरकार कठोर भुमिका घेणार असून, याबद्दल एक नवी योजना आखण्याच्या तयारीत आहे. यासाठी राज्यांना देखील विश्वासात घेतलं जाणार असून, देशातील नक्षल आणि माओग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP protest: आणखी एका भाजप नेत्याच्या मुलीचा 'सीजेपी'ला पाठिंबा! सत्तापक्षाला घरचा आहेर, धर्मेंद्र प्रधानांची उडवली खिल्ली

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Latest Marathi News Live Update : शनिवार आणि रविवारी किल्ले सिंहगड राहणार बंद

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

SCROLL FOR NEXT