cm uddhav thackeray Rajbhavan Speech google
महाराष्ट्र बातम्या

'विरोधी पक्षात असताना...', राष्ट्रपतींसमोर राजभवनात मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या हस्ते राजभवनातील नवीन दरबार हॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना राजकीय चिमटे काढले. या परिसरातील हवा फार थंडी आहे. इथली राजकीय हवा कशीही असू द्या, असं मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांनी टोला -

आज या नुतनीकरण केलेल्या, ऐतिहासिक-वैभवशाली परंपरा लाभलेल्या दरबार हॉलच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहाता आले याचा मला आनंद आहे. ही जागा आमच्यासाठी काही नवीन नाही. विरोधी पक्षात होतो तेव्हापासून वर्षभरातून एखादेवेळा येऊन आम्ही आमच्या व्यथा मांडत होतो. आम्ही रोज येत नव्हतो. आजही आमचा संवाद सुरू आहे. या वास्तूने १०० वर्षाहून अधिक काळात घडलेल्या घटना घडामोडी पाहिल्या. ३० एप्रिल १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी याच वास्तूत केले त्याचा विशेष आनंद आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

दरबार हॉलचे अप्रतिम असं सौंदर्य नव्या दमाने लोकांसमोर ठेवले आहे. मुंबईतील राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन आहे. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असं देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे. राजकीय हवा कशीही असू द्या. पण इथली हवा थंड आहे. पावसाळ्यात थुई-थुई नाचणारे मोर येतात. विषारी साप देखील इथंच दिसतात. अशी वास्तू शोधून सापडणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

संपूर्ण वास्तूचे जुनी वैशिष्ट्ये जपत आपण नवीन वास्तू उभारली आहे. जुना वारसा जपून आपण आधुनिकीकरणाकडे चाललो आहोत हे या वास्तूचे वैशिष्ट्य आहे. ऊन, वारा, पाऊस झेलताना इमारतीवरही परिणाम होतो. जुनी वैशिष्ट्ये कायम ठेऊन नुतनीकरण करण्याचे आवाहन पेलले आहे. आधुनिकता अंगी बाळगतांना संस्कृती जपणे, जुन्या नव्याचा समतोल साधणे गरजेचे आहे. पारतंत्र्यांच्या घटनांची आठवण जपणारी वास्तू सशक्त लोकशाहीचा वारसा पाहण्यासही सज्ज झाली आहे. या वास्तूत आनंददायी घटना घडत राहतील अशी अपेक्षा करतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT