मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे e sakal
महाराष्ट्र

हे काय स्वातंत्र्यासाठी केलेले आंदोलन नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्य सरकारने दहीहंडी उत्सवावर (Dahi handi celebration 2021) निर्बंध लावले असतानाही मनसे आणि भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांनी कारवाईचा इशाराही दिला असतानाही दहीहंडी उत्सव साजरा केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्यावरूनच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाष्य केले आहे. ठाण्यात ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

“काही जणांनी दहीहंडी केली. हे काय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी केलेले युद्ध नाही आहे. कोरोनाचे नियम तोडून आम्ही करुन दाखवलं हे काय मोठं स्वातंत्र्य नाही मिळवलं. त्याच्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. फुकट कोरोना वाटप करायला हा सरकारी कार्यक्रम नाही. याला विरोध करायला हा सरकारी कार्यक्रम नाही. मास्क घालणे, हात धुणे, अंतर ठेवणे या पाळल्या नाहीत तर तिसरी लाट येऊ शकते. केंद्राने दिलेल्या पत्रात देखील ते नमूद आहे,'' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दहीहंडीचा उत्सव साजरा करता येत नाहीये, याची मला जाणीव आहे. पण, सध्या गर्दी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोना संकट देशावर आहे. तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. केंद्र सरकारनेही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी करु नका, असं केंद्राने राज्यांना कळवलं आहे. जे आंदोलन करत आहेत त्यांनी केंद्राचे हे पत्र पाहावे, असंही ठाकरे म्हणाले.

दहीहंडीचा तो थरार, ते उधाण मला अजूनही आठवते. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. 90 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनेची ओळख. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे एक वेगळं नातं आहे. त्यामुळेच शिवसेनेबद्दल लोकांना, ठाणेकरांना वाटणारा विश्वास आजही कायम असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid-19: 'तो' पुन्हा येतोय ? कोरोनाच्या नव्या प्रकाराने वाढवली डोकेदुखी; या देशात पुन्हा मास्क घालण्याचे आवाहन

HSC Result: बारावीत नापास झालाय? टेन्शन नॉट! हे कोर्स ठरू शकतात लाईफ चेंजर

Latur 12th Exam Result : लातूर विभागाचा पॅटर्नचं वेगळा! यंदाही मुली ठरल्या अव्वल, विभागाचा 92.36 टक्के निकाल

Latest Marathi News Live Update: जॅकी श्रॉफचे 'सिंगम अगेन'साठी काश्मीरमध्ये शुटिंग, म्हणाला...

India Head Coach : BCCIसाठी थाला ठरणार मांडवली बादशाह? भारताच्या नव्या कोचच्या निवडीसाठी वापरणार धोनी फॅक्टर

SCROLL FOR NEXT