cm Uddhav Thackeray critisize navneet rana over hanuman chalisa and kashmir row  
महाराष्ट्र बातम्या

तर काश्मीरात जाऊन हनुमान चालिसा म्हणा; CM ठाकरेंचा राणा दाम्पत्याला टोला

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : आज शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा नुकतीच पार पडली या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष भाजपवर सडकून टीका केली आहे. या सोबतच मुख्यमंत्र्या हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना देखील त्यांचे नाव न घेता टोला लगावाला. (cm Uddhav Thackeray critisize navneet rana over hanuman chalisa and kashmir row)

हिंदूत्वाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालिसा म्हणा, असा टोला त्यांनी राणा दाम्पत्याचे नाव न घेता त्यांनी लगावला. ते म्हणाले की, उगाच कुठेतरी जाऊन दुधाचा अभिषेक करताय, हिंमत असेल तर काश्मीरमध्ये जाऊन काश्मीरी पंडितांची रक्षा करा, नामर्दांच हिंदूत्व आम्हाला शिकवू नका, मर्द असाल तर काश्मीरमध्ये जाऊन त्यांची रक्षा करा, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला दिला आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही.. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. भाजप प्रवक्त्यांनी प्रेषितांचा आपमान करण्याचा संबंध काय? आपल्या देवी-देवतांचा अपमान करायचा नाही तसं त्यांच्याही देवतांचा अपमान करायचा नाही, असे त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Mock Drill: मॉक ड्रिलदरम्यान स्मोक ग्रेनेडचा स्फोट; अहिल्यानगरात चार पोलिस कर्मचारी जखमी, ग्रेनेडची पिन पडली अन् काय घडलं!

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

SCROLL FOR NEXT