Dilip Walse-Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

गृहविभागावर मुख्यमंत्र्यांची कुठलीही नाराजी नाही : गृहमंत्री वळसे-पाटील

सकाळ डिजिटल टीम

'सर्वांना विश्वासात घेऊनच सगळे निर्णय होत असतात, त्यामुळं नाराजीचा प्रश्नच निर्माण होत नाही.'

राज्याच्या गृहविभागावर मुख्यमंत्र्यांची कुठल्याही प्रकारची नाराजी नाहीय. सर्वांना विश्वासात घेऊनच सगळे निर्णय होत असतात, त्यामुळं नाराजीचा प्रश्नच निर्माण होत नाहीय, असं स्पष्ट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी व्यक्त केलं.

वळसे-पाटील पुढे म्हणाले, गृहविभागावर मुख्यमंत्र्यांची कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आणि जर आमचा विभाग (गृहविभाग) कुठं कमी पडत असेल तर त्यावर आमचं लक्ष आहे. याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 6 वाजता मी मुख्यमंत्र्यांची भेटणार आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळं कोणीही आपली मतं मांडू शकतं. उद्या महाराष्ट्र पोलिसांच्या 'वन वन टू' कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास : उद्धव ठाकरे

गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज असल्याच्या वृत्ताचं स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी खंडन केलंय. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करीत आहेत, असं मुख्यमंत्री ठाकरेंनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री सचिवालयाकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलंय. यात म्हटलंय की, गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

संजय राऊतांनी आज नेमकं काय म्हटलं

आज संजय राऊतांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यात ईडीची कारवाई हे गृहखात्यावरचं आक्रमण आहे असं वक्तव्य आज संजय राऊतांनी केलं. त्यांचं हे वक्तव्य राष्ट्रवादीला उद्देशून होतं का? अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. राऊतांनी म्हटलं की, गृहखात्यानं अधिक सक्षम आणि कठोर होणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणा घुसतात. हे खरंतर गृह खात्यावरचं आक्रमण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT