महाराष्ट्र बातम्या

भाजप नेत्यांविरुद्ध मुख्यमंत्री ठाकरेंची नरेंद्र मोदींना गळ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रस्त्यांवर उतरून आंदोलने, मोर्चा, मेळावे घेऊन ठाकरे सरकारची कोंडी करणाऱ्या विरोधकांना म्हणजे भाजप नेत्यांना रोखण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविली असून, कोरोना टाळण्याचा भाग म्हणून राजकीय कार्यक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवरच धोरण आखण्याचा आग्रह ठाकरे यांनी धरला आहे. हे धोरण आणून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकडेही त्यांनी लक्ष्य वेधल्याने मोदींच्या धोरणाची उत्सुकता आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातून ठाकरे सरकार आणि भाजप नेत्यांमधील राजकीय वैर वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत मराठा,ओबीसी आरक्षण, मंत्री, आमदारांच्या चौकशा, १२ आमदारांच्या निलंबनावरून सरकार विरोधक आमने-सामने येत आहेत. सरकारविरोधात लोकांत जाऊन आंदोलने करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाही. कोरोनाचे संकट अजूनही संपले नसतानाही आंदोलने, मोर्चामुळे लोकांची गर्दी होत आहेत. त्यात आरक्षणावरून राज्यात सर्वत्र मेळावे, बैठका होत आहेत. सध्याच्या स्थितीत अशा प्रकारे गर्दी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना केले होते. तरीही कार्यक्रमांचा सपाटा सुरू राहिला.

कोरोनाच्या आढाव्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत झालेल्या ऑनलाइन बैठकीत ठाकरे यांनी गर्दीचा मुद्दा मांडला. या काळात सावध भूमिका म्हणून राजकीय कार्यक्रम, सभा, मेळाव्यांसाठी देशाच्या पातळीवरच धोरण आखण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, असेही ठाकरे यांनी सूचविले. कोरोना, पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेआडून ठाकरे यांनी विरोधकांना रोखण्यासाठी नवा उपाय शोधला आहे. मात्र,या उपायासाठी मोदी कितपत सकारात्मक असतील, याची उत्सुकता आहे. दरम्यान, मोदी यांनी धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी झाल्यास ठाकरे सरकारची डोकेदुखी कमी होण्याची आशा महाविकास आघाडीला आहे.

सत्ताधाऱ्यांचीही गर्दी

विरोधकांकडून आंदोलने, मोर्चा काढले जात असले तरी, सत्ताधाऱ्यांकडून म्हणजे, शिवसेनेने शिवसंपर्क अभियान हाती घेतले आहे. याआधी युवासेनेने मेळावे घेतले. त्यामुळेही गर्दी होत आहे. महागाईविरोधात काँग्रेसने मोदी सरकारविरोधात आंदोलनाचा सपाटा लावला असून, पक्षसंघटनेचे मेळावे वाढले आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबाबतच्या मोदी यांच्या धोरणामुळे सत्ताधाऱ्यांवरही वचक राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Kranti Morcha: मराठा क्रांती मोर्चाची शिर्डीत बैठक! जरांगे पाटलांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी

ताजमहालला हिरवा कंदील, निजामुद्दीन दर्ग्याला नकार; पाकिस्तानी शिष्टमंडळाबाबत भारताचा मोठा निर्णय, आणखी कुठं जाण्याची दिली परवानगी?

Latest Marathi News Live Update: पुण्यातील 'अमेझॉन' आणि 'बिग बास्केट'च्या डार्क स्टोअर्सवर एफडीएची धडक कारवाई

IND A vs PAK A: पाकिस्तानला हरवताच भारताचं सेमीफायनलचं तिकीट पक्कं होणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

Maharashtra Housing Society Election Rules : छोट्या हौसिंग सोसायट्यांना मोठा दिलासा! आता ३५ दिवसांऐवजी अवघ्या ९ ते १३ दिवसांत पार पडणार निवडणुका; राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT