Uddhav Thackeray News e sakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरेंच्या निर्णयाने मंत्रिपदावर गदा? विधान परिषदेसाठी सेनेचं धक्कातंत्र

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे मंत्र्याच्या पदावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सध्या निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. राज्यसभा निवडणुकीची चुरस असतानाच आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचीही तयारी जोरदार सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपलं सर्वस्व पणाला लावून या निवडणुकांच्या लढतीत उतरत आहेत. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या एका निर्णय़ामुळे मंत्रिमंडळ विस्तार होणार की काय? अशा शक्यता निर्माण झाल्या आहे. (CM Uddhav Thackeray News)

शिवसेनेकडून (Shivsena) विधानपरिषदेसाठी सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. मात्र यामुळे शिवसेनेतल्या मंत्रिपदावर असलेल्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. विशेषतः शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंना (Subhash Desai) उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता त्यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे.

शिवसेना नेते सुभाष देसाई सध्या राज्याचा उद्योग, खाण आणि मराठी भाषा विभाग सांभाळत आहेत. विधान परिषदेसाठी जर त्यांना सदस्यत्व मिळालं नाही, तर सहा महिन्यांपेक्षा जास्त त्यांना मंत्रिपदावर राहता येणार नाही. त्यामुळे आता या उमेदवारीमुळे त्यांच्या मंत्रिपदाचं काय होणार? मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT