महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांसमोर भिडले सेना-भाजपचे कार्यकर्ते

अजित झळके

कृष्णा नदीच्या महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, समवारी सांगलीत आले. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मुख्यमंत्र्यांच्यासमोरच भाजपच्या कार्यकर्यांनी घोषणाबाजी केली. भाजप आणि शिवसेनेचे दोन गट घोषणाबाजी करत आमने सामने आले. त्यामुळे झालेल्या गर्दीला हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य स्वरूपाचा लाठीमार करावा लागला. सांगलीतील मुख्य पेठेत दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयर्विन पुलावरून कृष्णा नदीची पाहणी करून पेठेत आले. तेथे व्यापाऱ्यांसह भाजपचे काही लोक आणि विविध संघटना निवेदन देणार होते. पोलिसांनी दहा ते पंधरा संघटनांच्या प्रत्येकी पाच पाच प्रतिनिधींना निवेदन देण्यासाठीची मुभा दिली होती, त्यानुसार लोक जमले होते. मुख्यमंत्री गाडीतून उतरल्यानंतर प्रचंड गर्दी झाली आणि या गर्दीत गोंधळ वाढू नये यासाठी सुरक्षा रक्षकांनी गराडा घातला. त्याच वेळी गोंधळाला सुरुवात झाली. भाजपने घोषणा द्यायला सुरुवात केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने ही घोषणाबाजी सुरू केली. परिणामी मुख्यमंत्र्यांना निवेदन न स्वीकारताच पुन्हा गाडीत बसावे लागले. अन्य संघटना निवेदन देता येणार नसल्याने त्यांनी ही नाराजी व्यक्त केली.

दोन्ही बाजूने गोंधळ वाढत गेला आणि घोषणा देत भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या आमने-सामने आले. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. काही संघटनांनी निवेदन देता न आल्यामुळे तेथेच निवेदन फाडून या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. दरम्यान मुख्यमंत्री गाडीत बसून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पेठांमध्ये रस्त्यावर बसून निषेध नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

SCROLL FOR NEXT