Eknath Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: 'CMOतून तुरुंगातील गुन्हेगारांशी डीलिंग, निवडणुकीआधी काढणार बाहेर'; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील सराईत गुन्हेगारांशी संपर्क साधला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांने केला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतानाच नेत्यांना ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्याने केलेल्या या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.(Latest Marathi News)

मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यातील तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याशी डिलिंग केली जात आहे. तसेच या अट्टल गुन्हेगारांना निवडणुकी आधी बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असा आरोप या नेत्यांने केला आहे.तर याबाबतचे पुरावे लवकरच देणार असल्याचंही त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून अनेक तुरुंगातील मोठ्या गुन्हेगारांशी संपर्क साधला जात असुन काहींना जामीन देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबतचे पुरावे मी लवकरच देईल. 302च्या गुन्ह्याखाली आत असलेल्या गुन्हेगारांना निडवणुकीपूर्वी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी गुन्हेगारांशी डिलिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.(Latest Marathi News)

तर या घडामोडी घडत असातानाच गृहमंत्री काय करत आहेत? या गोष्टीचा देवेंद्र फडणवीस यांना राग आला पाहिजे, असंही राऊत म्हणालेत. तर मी लोकप्रतिनिधी आहे. राजकारण नंतर. तुम्ही घटनात्मक पदावर आहात मिस्टर फडणवीस. आमचं काय वाकडं करणार आहात? जे करायचं ते करा. हिंमत असेल तर आमनेसामने लढा, असं आव्हानही संजय राऊत यांनी फडणवीसांना दिलं आहे.

तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तुरुंगातील गुन्हेगारांशी कसा संवाद सुरू आहे याची माहिती मी लवकरच देणार आहे. सरकारमधील लोक मुंबईपासून नाशिकपर्यंतच्या तुरुंगातील कैद्यांशी संवाद साधत आहेत. तुरुंगात मोबाईलचा वापर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जे सुरू आहे ते लवकरच बाहेर काढेन असंही राऊत म्हणाले आहेत. तुरुंगाच्या दारात कैद्यांची भेट घेतली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयावर लक्ष ठेवा. मुख्यमंत्री कार्यालयात अंडरवर्ल्डची टोळी बसली आहे, अशी टीका देखील राऊत यांनी केली आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT