schools sakal
महाराष्ट्र बातम्या

शाळा सुरू करताना ‘शिक्षणोत्सव’ साजरा करण्याचे आदेश

शिक्षणोत्सव साजरा करत असतानाच शाळांमधील शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती असायला हवी, असे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिले आहेत

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे : शाळा सुरू करताना प्रत्येक शाळेमध्ये ‘शिक्षणोत्सव’ साजरा करण्यात यावा. यात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनौपचारिक स्वागत करावे, जेणेकरून शाळा स्तरावर शैक्षणिक वातावरण निर्मिती होऊ शकेल. शिक्षणोत्सव साजरा करत असतानाच शाळांमधील शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती असायला हवी, असे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिले आहेत.

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे, तर शहरी भागातील आठवी ते बारावीच्या शाळांचे वर्ग सोमवारपासून (ता.४) सुरू करण्यात येत आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना यापूर्वीच जाहीर केल्या असून त्याचे पालन करावे. तसेच शाळेमध्ये १०० टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांच्या बैठका घेण्यात याव्यात. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरपीटीसीआर चाचणी सक्तीची करण्यात येऊ नये, असे सोळंकी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

शिक्षण आयुक्तांनी दिलेले आदेश :

  • विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आदींनी शाळांना भेटी द्याव्यात.

  • अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा ‘सोशल मीडिया साइटस्‌वर शाळा भेटीचे फोटो, व्हिडिओ अपलोड करावेत

  • ‘#शिक्षणोत्सव’ हा हॅशटॅंग वापरावा

  • विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शालेय गणवेशाचे वाटप करावे

  • सर्व शाळा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात

  • विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी उपचारात्मक अध्यापन करावे

मुख्यमंत्री साधणार संवाद

‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ कार्यक्रमातंर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व शाळा, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत. याची लिंक शालेय शिक्षण विभागातर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची बातमी, कॅबिनेटच्या बैठकीत 7 धडाकेबाज निर्णय

FACT CHECK : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात जाण्यासाठी विराट कोहलीने पाच कोटी घेतले? मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राने एकच खळबळ

निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया आघाडी'चा मोर्चा; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा आकाशवाणी परिसरात ठिय्या, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Vastu Tips: राजकारण आणि सरकारी नोकरीत यश मिळवून देतील घरातील 'या' २ दिशा; पण 'ही' एक चूक कधीही करू नका!

ती गोष्ट घडली अन् अजय देवगनने धरला तब्बल २० वर्षाचा अबोला; कोण आहे तो व्यक्ती आणि असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT