Shahaji Patil_Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदेंच्या हृदयात बुद्धाप्रमाणं करुणा; शहाजी पाटलांकडून स्तुतीसुमनं

मुख्यमंत्र्यांचा कष्टप्रद प्रवासही त्यांनी सांगितला उलगडून

सकाळ डिजिटल टीम

पैठण : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण इथं शिवसेनेच्या शिंदे गटाची जाहीर सभा पार पडली. या सभेत आमदार शहाजी पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळंली आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांचा कष्टप्रद प्रवासाचं पारायणही इथं त्यांनी केलं. एकनाथ शिंदेंच्या हृदयात गौतम बुद्धाप्रमाणं अपार करुणा असल्याचंही यावेळी ते म्हणाले. (Compassion like Gautama Buddha in CM Eknath Shinde heart Compliments from Shahji Patil)

शहाजी पाटील भाषणासाठी व्यासपीठावर उभे राहिले त्यापूर्वी 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील' हे गाणं दणक्यात वाजवण्यात आलं. त्यानंतर पाटलांच्या भाषणाला सुरुवात झाली. पाटील म्हणाले, तळागळातील जनतेविषयी ज्यांच्या हृदयात गौतम बुद्धाप्रमाणं अपार करुणा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राला लाभले आहेत.

समर्पित जीवन असल्यानं CM शिंदे कधी झोपणार नाहीत

एकनाथ शिंदे यांनी लहानपणापासून रात्रंदिवस काबाडकष्ट केलं. महाबळेश्वराच्या डोंगरात कोयनेच्यावर जमीनीत शेती करणं सोप नाही. तिथं चिखलातून कोळव माणसानचं ओढायचा, नांगुर माणसानंच धरायचा असतो आणि माग एका माणसानं अवजार धरायचं असतंय. साहेबांनी स्वतःच्या खांद्यानं नांगूर ओढलाय. स्वतःच्या खाद्याला दावं घेऊन कुळवं ओढलाय. चिखलात भाताची रोपं पेरलेली आहेत. एवढं काबाडकष्ट केल्यानंतरही संसार चालत नाही म्हटल्यावर ते ठाण्यात आले. आनंद दिघेंनी त्यांना रिक्षा घेऊन दिली त्यानंतर या रिक्षावर त्यांनी आपलं कुटुंब चालवलं. ज्या माणसाचं जीवन असं कुटुंबाप्रती समर्पित झालंय तो माणूस कधी झोपणार नाही, अशा शब्दांत शहाजी पाटील यांनी एकनाथ शिंदेंचा कष्टप्रद प्रवास सांगितला.

काय झाडी, काय डोंगार....या चेष्ठेवर केलं भाष्य

माझ्यावर खूप टीका झाली. डोंगार म्हटलं म्हणून, झाडी म्हटलं म्हणून. उद्धव ठाकरेंसारख्या माणसानं अशी टीका करावी का? मी शेतकऱ्याचं पोरगं आहे म्हणून आम्हाला हेच बरं वाटतंय. उद्धव ठाकरे बोलले तर आदित्य ठाकरे पण बोलले. पण आम्ही म्हटलो ठीक आहे आपलेच आहेत. पण त्यानंतर संजय राऊत उठले आणि भडाभडा करायला लागले पण त्यांना माफी नाही. आमच्यावर टीका झाली पण सातारा, सह्याद्री आम्ही पिंजून काढलाय. या सगळ्या टीका आम्ही सहन केल्या आणि वाट पुढे चालत राहिलो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या विधानावरील चेष्ठेवरही भाष्य केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबई-हैदराबाद हायस्पीड ट्रेन नवी मुंबई विमानतळाला जोडणार! कसा असणार मार्ग? वाचा सविस्तर

Pune Crime : तरुणीशी संबंध तोडण्याच्या वादातून कात्रजमध्ये तरुणाची हत्या; दोन आरोपी फरार!

Prashant Jagatap Resignation : शरद पवारांच्या पक्षाला महापालिका निवडणुकीआधी पुण्यात मोठा धक्का; प्रशांत जगताप यांनी सोडलं शहाराध्यक्ष पद!

Jalgaon Municipal Elections : जळगावात 'नारीशक्ती'चा डंका! १८ पैकी १२ नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी महिला विराजमान

Latest Marathi News Live Update : चाळीसगावात गोळीबार प्रकरणी चार आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT