बेरोजगारी sakal
महाराष्ट्र बातम्या

बेरोजगारीवर ठोस उपाय! दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता दरमहा रोजगाराची संधी; जिल्ह्यात आता दरमहा होणार रोजगार मेळावे

दहावी, बारावी, आय.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशियन, मशिन ऑपरेटर, बी. कॉम, एम.कॉम, अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना रोजगार, नोकरीची दरमहा संधी असणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व टेंभुर्णीतील डॉ. भारत पाटील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी उद्या गुरुवारी (ता.२१) पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उमेदवारांनी त्याठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन विभागाने केले आहे. आता बेरोजगारी कमी करण्यासाठी दरमहा रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत.

कुर्डुवाडीतील (ता. माढा) रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, आय.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशियन, मशिन ऑपरेटर, बी. कॉम, एम.कॉम, अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या ६२१ पेक्षा जास्त उमेदवारांना रोजगार, नोकरीची दरमहा संधी असणार आहे. जिल्ह्यातील दहा उद्योजक तेवढी पदे भरणार आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिझ्यूमच्या तीन प्रती आणि कागदपत्रांसह गुरुवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत श्री गणेश हॉल, वागळे हॉस्पिटल जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ०२१७-२९९२९५६ या दूरध्वनीवर अथवा सोलापूर महापालिकेसमोरील नॉर्थकोट मैदानाजवळील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयात येऊन माहिती घ्यावी, असे आवाहन अधिकारी हणमंत नलावडे यांनी केले आहे. https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट देऊनही माहिती घेता येईल, असेही त्यांनी सांगितले. सुशिक्षित तरुणांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार, करिअर, नोकरीची संधी मिळेल, असेही श्री. नलावडे यांनी सांगितले.

तुम्ही नोंदणी करा, नक्की मिळेल जॉब

ज्या तरुण-तरुणींना रोजगार, नोकरीची आवश्यकता आहे, ते त्यांची शैक्षणिक कागदपत्रे घेऊन नॉर्थकोट मैदानाजवळील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयास भेट देऊ शकतात. त्याठिकाणी त्यांची नोंदणी केली जाते. दरमहा होणाऱ्या रोजगार मेळाव्यापूर्वी ज्याठिकाणी त्या उमेदवारास शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध होईल, तेथे त्याला संधी दिली जाते. किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असण्याची अट आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असेच नियोजन असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT