Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: शिंदे गटात गोंधळ! शिरसाटांचे बाहेर पडण्याचे संकेत तर सत्तार म्हणतात 'शिंदेच मुख्यमंत्री...'

अजित दादांमुळे शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार; संजय शिरसाट यांचं मोठं विधान

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवार केंद्रबिंदू ठरत आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या वारंवार चर्चा होत आहेत आणि अजित पवार त्यावर वारंवार खुलासा देखील करत आहेत. सोमवारीही त्यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा होती. तसंच आज आमदारांची बैठक बोलावल्याचीही जोरदार चर्चा होत आहे. अशातच राष्ट्रवादी, भाजप यांच्यासोबत शिवसेनेच्याही प्रतिक्रिया समोर येत आहेत.

या संपूर्ण घडामोडीवर बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले कि, पुढचे पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच राहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आय काही भूमिका राहील तीच भूमिका आमची राहील. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे' असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांचा विचार करूनच निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी केली. तर 'मला त्यामध्ये कोणतीही तीळमात्र शंका वाटत नाही. एकनाथ शिंदे यांनी सामान्य लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. यामुळे पुढच्या निवडणुकाही त्यांच्या अध्यक्षतेखाली होतील. तर पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आसतील असा माझा विश्वास आहे, असं सत्तार यांनी म्हंटलं आहे.

अजित दादांमुळे शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार; संजय शिरसाटांचं मोठं विधान

अजित पवार राष्ट्रवादीपासून वेगळे होऊन आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांना आमच्यासोबत यायचं असेल तर आमची विचारसरणी मान्य करावी लागले. मात्र अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह भाजपसोबत गेले तर शिंदे गट अर्थात शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असंही शिरसाट यांनी नमूद केलं.

संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार हे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून नाराज आहेत. मात्र अजित पवार यांची नाराजी आणि आमची सर्वोच्च न्यायालयातील केसचा काहीही संबंध नाही, असा दावाही शिरसाट यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story: मेहनतीच्या बळावर तिन्ही मुले डॉक्टर; एकाची एमबीबीएस तर दोघांची पदव्युत्तरला एंट्री, वडिलांनी स्वत: केला स्वयंपाक!

Viral Video: 'डोगेश भाई' ने आयआयटी मुंबईच्या क्लास रुममध्ये लावली हजेरी, श्वानाच्या व्हायरल व्हिडिओने घातला धुमाकूळ

Central Railway: चाकरमान्यांना दिलासा! होळी, उन्हाळी सुट्टीसाठी विशेष रेल्वे, १००हून अधिक गाड्यांचे आयोजन; पाहा वेळापत्रक

Post Office Scheme: या सरकारी योजनेत पैसे दुप्पट! FD पेक्षा कशी वेगळी? कोण करू शकतो गुंतवणूक? जाणून घ्या सर्व माहिती

Pune News: सकाळ + स्टडीरूमच्या ‘ग्रेट भेट’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांचा दिशादर्शक संवाद

SCROLL FOR NEXT