महाराष्ट्र बातम्या

अशोक चव्हाणांनी घेतली फडणवीसांची भेट; महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

दत्ता लवांडे

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नवा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यानंतर आता त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने सत्तांतरानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या अंदाज लावला जात आहे.

(Former CM Ashok Chavan Meets Devendra Fadnavis)

दरम्यान, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर राज्यात नव्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीवेळी ते गैरहजर होते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदारांचा गटही गैरहजर असल्याने त्यांच्यातील नाराजी उघड झाली होती. त्यांनतर आता भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांनी फडणवीसांची भेट घेतली आहे.

नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून दुसऱ्या टप्प्यातील विस्तार रखडला आहे. पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर आता भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट फोडण्यात येणार असून त्यातील दोन आमदारांना मंत्रिपद देणार असल्याच्या चर्चा आहेत. काँग्रेसच्या आमदारांना फोडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा आहेत.

दरम्यान, याच काळात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी फडणवीसांची भेट घेतल्यामुळे आता त्यांच्यासोबत काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आता शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये फूट पडून महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार का याकडे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'कंपनी असावी तर अशी' कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिली महागडी कार, Video पाहून नेटकरी म्हणाले, 'असं नशीब सगळ्यांचं नसतं'

हरदीप सिंग पुरी राज्यसभेची पोटनिवडणूक लढणार, भाजपने उमेदवारी केली जाहीर

Abhijit Bhosale Six Months Jail Sentence : सांगलीत मोठी खळबळ! राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकाला 6 महिने तुरुंगवास, कोर्टाच्या निकालाने राजकीय वर्तुळात चलबिचल

Cyclone Arnab Photo: भारतावर चक्रीवादळाचे संकट! अंतराळातून टिपले पृथ्वीचे फोटो... भीषण दृश्य, अनेक राज्यांना धोका

Marathi News Live Updates : नाशिकमध्ये दुष्काळ अन् वाढत्या उष्णतेचा द्राक्षबागांना फटका; बागा वाचवण्यासाठी कालव्याच्या पाण्याची मागणी!

SCROLL FOR NEXT