महाराष्ट्र बातम्या

पवार साहेब आमचे मार्गदर्शक - बाळासाहेब थोरात

नामदेव कुंभार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीचं सत्र सुरुचं आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यानंतर आज, सोमवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांची भेट घेतली. मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये तणावाचं वातावरण होते. त्यामुळेच या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे. तसेच काँग्रसे आणि राष्ट्रवादी यांच्यातील तणाव निवळल्याची चर्चा राजकीय वातावरणात सुरु आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. शरद पवार आमचे मार्गदर्शक असल्याचं वक्तव्य यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद निवळल्याची चर्चा आहे.

शरद पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत. आज, त्यांच्या भेटीला गेलो होतो. या भेटीमध्ये महामंडळांच्या जागावाटपावर आणि इतर मुद्द्यावर चर्चा झाली. सत्तेतील तिन्ही पक्षांना महामंडळाच्या समान जागा मिळतील. मराठा आरक्षणावर आम्ही गंभीर आहोत. सरकार मराठा समाजाच्या सोबत आहे. संभाजीराजो माझ्याकडे येऊन गेले. त्यांनी काही अपेक्षा केल्या आणि आम्ही त्यावर अत्यंत गंभीर काम करत आहोत. राज्यातील सरकार मराठा समाजातील लोकांसोबत आहे, असं थोरात म्हणाले. संभाजी राजे योग्य विचार करत आहेत. मराठा आरक्षणावरुन ते कोणतेही राजकारण करत नाही. ते आंदोलन योग्य रित्या करतील.

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आक्रमकपणे बाजू लावून धरली होती. तसेच पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकच्या घोषणा करून एकच बॉम्ब टाकला होता. त्यामुळे शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला वाद निवळण्याची चिन्ह आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT