Balasaheb Thorat News esakal
महाराष्ट्र बातम्या

Balasaheb Thorat : तांबेवरचा अन्याय, खालच्या भाषेत विधानं अन्...; थोरातांचे पटोलेंवर गंभीर आरोप

बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडला पत्र लिहून आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमधलं अंतर्गत कलह आता एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचला आहे. थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा हायकमांडकडे दिला आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काही गंभीर आणि थेट आरोप केले आहेत.

या पत्रामध्ये बाळासाहेब थोरात यांनी पदवीधर निवडणुकीच्या वेळी सत्यजित तांबे यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल भाष्य केलं आहे. थोरात पत्रात म्हणतात की, आपण माफी मागायला तयार असताना प्रदेशाध्यक्ष दुसऱ्या उमेदवाराला घेऊन फिरत होते, असं सत्यजित तांबे म्हणाले होते. नाना पटोले यांनी हे प्रकरण मिटवण्याऐवजी ते वाढवले. जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. याबाबत पक्षाने एकदाही विचारणा केली नाही.

थोरात या पत्रात पुढे म्हणतात, "सुधीर तांबे, सत्यजित तांबे यांना त्यांची बाजू मांडू न देताच पक्षातून निलंबित करण्यात आलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपल्याशी चर्चा केली नाही. शिवाय खालच्या स्तरावरची अनेक विधानं केली. नाना पटोलेंनी आमच्याविषयी इतका द्वेष असेल तर त्यांच्याबरोबर काम करणं अशक्य आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : भाजप आमदार बसवराजविरुद्ध गुंडाच्‍या खूनप्रकरणी एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT