ticket for chandrakant patil sakal
महाराष्ट्र बातम्या

चंद्रकांत पाटील यांच्यासाठी तिकीट बुक

'कोल्हापुरातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा आणि पोट निवडणूक लावावी निवडून नाही आलो तर राजकारणातून संन्यास घेईल आणि हिमालयात निघून जाईन' असे म्हटले होते.

नमिता धुरी

मुंबई : "निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन", असे म्हणणाऱ्या भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 'थ्री टायर एसी' रेल्वेचे तिकीट बुक केले आहे; मात्र मी स्वत: निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन असे म्हटल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले आहे.

दोन वर्षांपूर्वी एका सभेत बोलताना चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना आव्हान देताना 'कोल्हापुरातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा आणि पोट निवडणूक लावावी निवडून नाही आलो तर राजकारणातून संन्यास घेईल आणि हिमालयात निघून जाईन' असे म्हटले होते. आता कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांचा १८ हजार मतांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा पराभव केला आहे. त्यामुळे पाटील यांचे जुने वक्तव्य पुन्हा समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने चंद्रकांत पाटलांसाठी (Chandrakant Patil) हरिद्वारचे थ्री टायर एसी तिकीट बुक करण्यात आले आहे. सध्या उन्हाळा सुरू असून त्यांना त्रास होऊ नये म्हणून एसी तिकीट बुक केल्याचे राष्ट्रवादीच्या (NCP) वतीने सांगण्यात आले आहे. तिकीटाबरोबर जेवणाचीही सोय करण्यात आली आहे.

कोल्हापुरात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला. यात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे.

भाजपने (BJP) या जागेवर आपणच निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु भाजपला धक्का बसला आहे. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर या जागेवर पोट निवडणूक लागली होती. त्यात महाविकास आघाडीकडून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि आता त्यांचा विजय झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

Plastic Waste Drive: उरुळी कांचनमध्ये ‘माझे प्लास्टिक – माझी जबाबदारी’ संकल्पनेतून प्लास्टिक बँक; १ किलो प्लास्टिकच्या बदल्यात महिलांना साखर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

IND vs AFG, ODI: रोहित शर्मा रनआऊट झाल्यानंतर नक्की काय म्हणाला? शुभमन गिलनेच केला खुलासा

Illegal Pistol Seized: इंदापूरमध्ये अवैध गावठी पिस्तूलासह युवक अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT