Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: राज्यातील राजकीय भूकंपानंतर विरोधकांमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष; आता विरोधी पक्षनेतेपद...

अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री; पद आणि गोपनीयतेची घेतली शपथ

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. (Latest Marathi News)

त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महायुतीचं बळ आणखी वाढलं आहे.(Latest Marathi News)

अजित पवार यांना राज्यपाल रमेश बैस यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. त्यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. आज एकूण 9 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत या सर्व मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात येणार आहे.(Latest Marathi News)

दरम्यान, अजित पवार यांच्या शपथविधीशी राष्ट्रवादीचा काहीच संबंध नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचं शरद पवार यांच्याशी बोलणं झालं. या बंडाशी संबंध नाही. मी खंबीर आहे, असं शरद पवार यांनी राऊत यांना सांगितल्याचं राऊत यांनी ट्विट करून सांगितलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT