Thackeray Vs Congress Esakal
महाराष्ट्र बातम्या

Thackeray Vs Congress: उद्धव ठाकरे, मविआतील पक्षाला कमजोर करण्याचं काम करतायत; नाना पटोलेंचा गंभीर दावा

उद्धव ठाकरे यांना सूचना देऊनही त्यांनी स्नेहल जगताप यांना प्रवेश दिला ही त्यांची चूक आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

काँग्रेसच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी शनिवारी (6 मे) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. हे काँग्रेसला अजिबात पटलेलं नाही असं दिसुन येत आहे. उद्धव ठाकरे यांना सूचना देऊनही त्यांनी स्नेहल जगताप यांना प्रवेश दिला ही त्यांची चूक आहे. काँग्रेस त्याजागी आपला उमेदवार देईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद वाढू लागल्या आहेत अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

महाडमध्ये (शनिवारी 6 मे) रोजी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत काँग्रेसच्या महाडमधील नेत्या स्नेहल जगताप यांनी आपल्या कुटुंबासह ठाकरे गटात प्रवेश केला. त्यातच त्यांना शिवसेनेचे नेते (शिंदे गट) भरत गोगावले यांच्याविरोधात उमेदवारी देखील जाहीर केली. परंतु यावर काँग्रेस नाराज असल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंना सांगूनही त्यांनी स्नेहल जगताप यांना प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली. पण काँग्रेस या ठिकाणी उमेदवारी देईल, असं असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं की, त्यांनी हे करु नका. पण त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षाला कमजोर करण्याचं काम होत असेल तर ते चुकीचं आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत ही चर्चा करु, ती जागा काँग्रेस पक्षाची आहे, ती आम्ही लढू," अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

राज्यातील महाविकास आघाडीवरून सध्या अनेक मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पक्षांतर्गत वाद, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य, नेत्यांचे पक्षांतर, सामनातून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर होणारी टीका, नेत्यांची नाराजी या संपूर्ण गोष्टींमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होतं आहे का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT