Jaiprakash Chhajed Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jaiprakash Chhajed Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

नाशिक येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंटकचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचं निधन झालं आहे. नाशिक येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, काल (मंगळवारी) रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. ते 75 वर्षांचे होते.

इंटकचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच, मंगळवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस भवनमध्ये ठेवण्यात येणार आहे. आज (बुधवारी) संध्याकाळी नाशिक अमरधाम मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले जयप्रकाश छाजेड हे कामगार चळवळीत सक्रिय होते. इंटकचे ते प्रदेशाध्यक्ष होते. काँग्रेस पक्षात त्यांनी शहर आणि राज्य पातळीवर अनेक संघटनात्मक पदे भूषवली आहेत. नाशिकच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीतील प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख होती.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छाजेड यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, मुलगा प्रीतिश हितेंद्र आणि आकाश असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

IND vs SL 1st Test: देवदत्त पडिक्कल IN, सर्फराज खान OUT! गंभीरने खेळपट्टी पाहिली अन् Playing XI ठरली; जाणून घ्या संभाव्य संघ

Surat-Chennai Expressway : परंडा-तुळजापूर तालुक्यातील 31 गावांत भूसंपादन वेगात; शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींचा मोबदला, 481 हेक्टर क्षेत्र ताब्यात

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

SCROLL FOR NEXT