Amit Deshmukh Esakal
महाराष्ट्र बातम्या

Amit Deshmukh : काँग्रेसचे नेते अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर? निलंगेकर म्हणतात..

राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा शाबूत ठेवण्यासाठी देशमुख भाजपाच्या वाटेवर?

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं. आमदाराच्या या वक्तव्यामूळे लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली. राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा शाबूत ठेवण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हंटलेलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात निलंगेकर यांनी बोलताना म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर आहेत. आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा शाबूत राखण्यासाठी अमित देशमुख भाजपाच्या वाटेवर असल्याचं निलंगेकर यांनी म्हंटलं आहे. पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले की, जरी अमित देशमुख भाजपमध्ये येण्यास इच्छूक असले तरी मात्र आम्ही त्यांना पक्षामध्ये घेणार नाही.

हे ही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

लातुरच्या राजकारणात देशमुख घराण्याचं चांगलंच वर्चस्व आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. लातुर जिल्ह्यात देशमुख घराण्याला मोठा जनाधार लाभला आहे. मात्र अमित देशमुखांनी काँग्रेसला राम राम करून कमळ हाती घेतल्यास हा काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो.

तर निलंगेकर पुढे बोलताना म्हणाले, काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांचा भाजप प्रवेश माझ्या युवा कार्यकर्त्यांना आवडणार नाही, असे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर पडदा पडला आहे.

तर देशमुख भाजपात येणार नाहीत व त्यांना आम्ही घेत नाही. देशमुख भाजपत आलेले माझ्या युवा कार्यकर्त्यांना आवडणार नाही. देशमुख हे लातूरचे प्रिन्स राजकुमार आहेत. सतत सत्तेत राहावे, अशी त्यांची इच्छा आहे. असे असले तरी जनतेचे प्रश्न कधीच देशमुख यांनी मांडले नाहीत असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT