Congress
Congress 
महाराष्ट्र

अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांकडून अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पितृपक्ष संपताच काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर रविवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज (सोमवार) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेत्यांसोबतच विद्यमान आमदारांना; तसेच पाचही कार्याध्यक्षांना स्थान दिले आहे. काँग्रेसने पहिल्या यादीमध्ये लोकसभा निवडणूक लढविलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि के. सी. पाडवी यांना विधानसभेसाठी मैदानात उतरवले आहे. सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव निलंगेकर व दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या वारसदारांनाही काँग्रेसने पुन्हा संधी दिली. मात्र, विद्यमान आमदार असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा काँग्रेसने केली नसल्यामुळे सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्‍यता आहे. 

आज भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी काढलेल्या रोड शोला चांगला प्रतिसाद मिळाला. तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधून अर्ज दाखल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : राजगड मतदारसंघात मोठा गोंधळ, माजी मुख्यमंत्र्यांनी थांबवली मतमोजणी

Odisha Election Result: ओडिशामध्ये मोदीराज? नवीन बाबू पिछाडीवर, भाजपला मिळालं बहुमत

Maharashtra Lok Sabha Election Results Live : वंचित बहुजन आघाडी मुंबईत फेल? अपेक्षेपेक्षा वंचित बहुजन आघाडीला अत्यल्प मतदान

पहिल्या पाच फेऱ्यात आमदार प्रणिती शिंदे अन्‌ राम सातपुतेंना किती मतदान, कोणत्या मतदारसंघातून किती मतदान, जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 : मोदींची गॅरंटी, मंगळसूत्र, टेम्पो आणि बरंच काही...; यंदाची लोकसभा याच मुद्द्यांवर गाजली!

SCROLL FOR NEXT