Ashok Chavan 
महाराष्ट्र बातम्या

चंद्रकांतदादा, 'ती' तुमची मेगाचूक होती : अशोक चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : निवडणुकीपूर्वी केलेल्या मेगाभरतीमुळे भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का बसल्याचे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर त्याविषयी बोलताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ती मेगाभरती फक्त चूक नव्हे, तर मेगाचूक होती असे म्हटले आहे. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांची भाजपने मेगाभरती केली होती. या मेगाभरतीमुळेच भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का लागल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भरतीच्या प्रयोगामुळेच भाजपचे नुकसान झाल्याची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिली आहे. यावरून अशोक चव्हाण यांनी ट्विट करत चंद्रकांत पाटलांनी तुमची मेगाचूक असल्याचे म्हटले आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, की भाजपने नेत्यांची मेगाभरती करण्याऐवजी महाराष्ट्रातील तरूणांसाठी रोजगाराची मेगाभरती केली असती तर ते राज्याच्या अधिक हिताचे ठरले असते. त्यामुळे चंद्रकांतदादा, ती केवळ चूक नव्हती, तर 'मेगाचूक' होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'लिव्ह इन' पासून घरातील धान्यापर्यंत! जनगणनेदरम्यान विचारले जाणार ३३ प्रश्न, ऑनलाइन माहिती भरण्याचीही सुविधा...

Patas Sugar Factory: पाटस साखर कारखान्यात बगॅसला भीषण आग; ट्रक जळून खाक, अग्निशामक यंत्रणा उशिरा पोहोचली अन्..

Crime News : आणखी एक श्रद्धा ! नौदलाच्या अधिकाऱ्याने वादानंतर प्रेयसीची केली हत्या, तुकडे करुन फ्रिजमध्ये लपवला मृतदेह

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची आज SIT चौकशी होणार?

Claude Mythos Leak : सायबर कंपन्यांना धक्का! AI क्लॉड मिथोस लीकमुळे शेअर मार्केट कोसळले; एका दिवसात १४.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान

SCROLL FOR NEXT