Nana Patole and Narendra Modi Nana Patole and Narendra Modi
महाराष्ट्र बातम्या

भाजपमुळं महाराष्ट्रात राजकारणाचा घसरला दर्जा; पटोलेंचा आरोप

राजकारणात भ्रष्टाचाराचे पायंडे निर्माण करण्याचे काम फडणवीसांनी केले

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्यात सुरु असणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या राजकारणावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) सरकार महाराष्ट्रात (Maharashtra) आल्यानंतर राज्याच्या राजकारणात भ्रष्टाचाराचे पायंडे निर्माण करण्याचे काम सुरु झाले. भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. राजकारणाचा स्तर खाली आणायचे काम भाजप करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करत व्हिडिओ शेअर केला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधताना पटोले म्हणाले, मोंदीच्या सरकारने (Narendra Modi) सत्तेत आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राजकारणाचा स्तर खाली चालला आहे असा घणाघात पटोले यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीसांचे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर राज्याच्या राजकारणात भ्रष्टाचाराचे पायंडे निर्माण करण्याचे काम सुरु झाले.

महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा घसरला

भाजपचे सरकार नव्हते त्या आधीच्या काळात महाराष्ट्रात राजकारणाचा एक दर्जा होता. त्याचा आदर्श राखला जायचा. महाराष्ट्राचा हा आदर्श अनेक राज्यात घेतला जायचा. मात्र आज भाजपने जो थयथयाट सुरु केला आहे यामुळेच महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा घसरला आहे. भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्तेबाहेर राहिलेच तर त्यांचे नेते राजकारणाचा स्तर खाली आणायचे आणि खोटे आरोप लावायचे आणि सत्ता कशी ताब्यात घ्यायची असा प्रयत्न महाराष्ट्रात सुरु आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण खालावत असल्याचे चित्र आहे अशी खंत पटोले यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'होर्मुज'वर काही तासांत तोडगा निघणार? करार झाल्याचा अमेरिकेचा दावा; मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता

Amazon Container Accident: चालकाला डुलकी लागल्याने ॲमेझॉनचा कंटेनर महामार्गावरील खड्ड्यात पलटी; मोठे नुकसान, मोठी दुर्घटना टळली

Manoj Jarange Warning Meet: माढ्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या इशारा बैठकीसाठी जोरदार तयारी; विविध समित्यांची स्थापना, मराठा समाजात उत्सुकता

Marathi Live Updates News: वारजेतील वडापाव सेंटरसह हॉटेलचा परवाना निलंबित

Nashik Rail Protest: पुणे-नाशिक सरळ रेल्वेमार्गासाठी ९ ऑगस्टला आळेफाट्यावर चक्काजाम; पक्षनिरपेक्ष जनआंदोलनाची हाक

SCROLL FOR NEXT