Congress leader Nana Patole On Maharashtra CM post Marathi political news  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्री पदासाठी नाना पटोलेही इच्छुक; म्हणाले, देवाला मला...

रोहित कणसे

राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी केली जात आहे. यादरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा विरोधकांचा उमेदवार कोण असणार यावरून राजकीय चर्चा होताना दिसतात. मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नेत्यांच्या यादीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल त्यांची इच्छा बोलून दाखवली आहे.

आपण मुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ती पूर्ण होवो असे पटोले म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर आणि खुलताबाद येथील भद्रा मारुती देवस्थान दर्शनासाठी पोहचले होते. तसेच खुलदाबाद शहरातील दर्ग्यावरती त्यांनी चागर देखील चढवली. यावेळी नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदाबद्दल प्रश्न विचारला. एबीपी माझाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

नाना पटोले म्हणाले की, "कार्यकर्तेच नाही तर सामान्य लोकांच्या मनात हा विचार येत असेल तर ही दैवी कृपा आहे. लोक या श्रद्धेने काम करतात. शेवटी देव कोणालातरी निमीत्त करत असतो, देवाला मला निमीत्त करून अजून काही चांगलं करून घ्यायचं असेल तर तो देवांचा अशीर्वाद असतो. मनुष्य हा कृती आणि कर्म करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे जे काही कोणाच्या मनोकामना, सोबती आणि चाहत्यांच्या इच्छा असतील ती पूर्ण होवो" असे नाना पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT