Congress leader Prithviraj Chavan criticizes Governor Bhagat Singh Koshyari esakal
महाराष्ट्र बातम्या

Congress : शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यानंतर कोश्यारींचं वागणचं बदललं; माजी मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांवर प्रहार

शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांचं वागणं अत्यंत वादग्रस्त ठरलं.

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर आमदार चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीये.

कऱ्हाड : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यपाल पदाची गरिमा नष्ट केली. तरीही 15 महिने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यास टाळाटाळ केली. त्याचं उत्तर केंद्र सरकारला द्यावं लागणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर आमदार चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीये. ते म्हणाले, राज्यपाल कोश्यारी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली आहे. त्यांचा राजीनामा घ्यावा, त्यांना परत बोलवावं असं महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न झाले. राज्यपाल पद हे संविधानिक पद आहे. आता त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. सरकारच्या कामात हस्तक्षेप करणं अपेक्षित नाही. मात्र, कोश्यारी स्वतः मुख्यमंत्री होते. त्यामुळं ते सक्रिय राजकारणातून बाहेर जावू शकले नाहीत.

'कोश्यारींनी आमदारांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणली'

महाराष्ट्रात आल्यावरही त्यांनी वेगवेगळी विसंगत वक्तव्ये करत स्वतःवर आक्षेप ओढवून घेतले. कारण, नसताना बेजबाबदार वक्तव्येही त्यांनी सातत्यानं केली. तसं पाहिलं तर राज्यपालांवर कोणी टीका टिप्पणी करत नाहीत. आक्षेप घेत नाहीत. मात्र, कोश्यारी त्याला अपवाद ठरले. कॅबिनेट मंत्री मंडळानं 12 जणांची यादी दिली होती. त्यांना आमदार म्हणून मान्यता न देता 15 महिने त्यावर निर्णय घेतला, त्यामुळं आमदारांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणली. तेही त्यांचा राजीनामा मागण्याचा महत्वाचं आक्षेपाचं कारण होतं, असं चव्हाण यांनी सांगितलं.

'शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यानंतर कोश्यारींचं वागणं बदललं'

महाविकास आघाडीचं सरकार जावून शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांचं वागणं अत्यंत वादग्रस्त ठरलं. सतत आपण न्यूजमध्ये राहिलं पाहिजे. चर्चेत राहिलं पाहिजे, असा त्यांचा हट्ट होता. त्यामुळं राज्यपाल पदाची गरिमा त्यांनी नष्ट केली, असं म्हणावं लागेल. त्याच सोबत 15 महिन्यापासून त्यांनी दिलेला राजीनामा का स्वीकारला नाही. याचं उत्तरही केंद्र सरकारला द्यावं लागणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant: कोणालाही अपेक्षा नव्हती! पदभार घेताच CJI सूर्यकांतांचा निर्णय देश चकित करणारा, सर्वात मोठी समस्या संपणार?

Nagpur News : 'दैनिक नवप्रभात'च्या संपादकांच्या घराला लक्ष्य; अवैध धंद्याला विरोध केल्याने दगडफेक, काचा फुटल्या...

सचिन पिळगावकर की अशोक सराफ! कोण जास्त श्रीमंत? संपत्तीत कोण आहे पुढे?

Farmer Success Story: 'धुमाळवाडीच्या द्राक्षांना आखाती देशात भाव'; फळबाग लागवडीत वृद्ध शेतकऱ्याची किमया, वर्षाकाठी ५० लाखांची कमाई !

Satara News: 'मद्यधुंद युवतीचा धिंगाणा': कऱ्हाड- चिपळूण रस्त्यावरील घटना; वाहनांच्या रांगा, नशा चडली अन्..

SCROLL FOR NEXT