Prithviraj Chavan vs Modi Government esakal
महाराष्ट्र बातम्या

देशात हुकुमशाही पध्दतीनं कारभार सुरू; माजी मुख्यमंत्र्यांची मोदी सरकारवर टीका

'संसदेत कोणती चर्चा होत नाही, त्यामुळं फार चिंतेचं वातावरण आपल्या देशात आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'देश चुकीच्या लोकांच्या हातात असून हुकुमशाही पध्दतीनं कारभार सुरू आहे.'

Prithviraj Chavan : सध्या देशात महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सरकारविरोधात काँग्रेस वेळोवेळी आंदोलन करताना दिसत आहे. मात्र, महागाई काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधलाय.

मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटलेले आहे, ते गोंधळलेले आहेत. भरमसाठ करवाढ करून डिझेल-पेट्रोलच्या किंमती वाढवलेल्या आहेत. जीएसटीमध्ये वाढ करून आणखी करवाढ करून महागाई वाढवलेली आहे. आज अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळं भारत देशात गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आली असल्याचे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

तांबवे (ता. कराड) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस (Congress) पक्षाकडून ऑगस्ट क्रांती दिनी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी आज देशात महागाई, बेरोजगारीसह सरकारच्या चुकीच्या धोरणावर हल्लाबोल केलाय. देश चुकीच्या लोकांच्या हातात असून हुकुमशाही पध्दतीनं कारभार सुरू असल्यानं लोकशाहीला हानीकारक असल्याचं ते म्हणाले. आमदार चव्हाण म्हणाले, जे श्रीलंका, पाकिस्तान, युके आणि बांग्लादेशात झाले. तशी परिस्थिती भारतात येवू नये, यासाठी योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. संसदेत चर्चा होत नाही, त्यामुळं फार चिंतेचं वातावरण आपल्या देशात आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT