Prithviraj Chavan News Sakal
महाराष्ट्र बातम्या

Prithviraj Chavan : राष्ट्रवादी क्रमांक एकचा असेल तर ठाकरेंचा तीन नंबरचा पक्ष; पृथ्वीराज चव्हाणांचा घाव

Solapur News: दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष असल्याचं म्हटलं होतं.

संतोष कानडे

Solapur News: दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष असल्याचं म्हटलं होतं. तर काँग्रेस लहान भाऊ असल्याचा उल्लेख केला होता. त्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

20 मे रोजी कोल्हापूरमध्ये बोलतांना अजित पवार म्हणाले की, आपल्याला महाविकास आघाडी मजबूत ठेवण्याचं काम करायरचं आहे. आपली जास्त ताकद असेल तर मविआमध्ये महत्व टिकेल.

यापूर्वी काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या त्यामुळे वाटाघाटी करताना लहान भाऊ म्हणून आम्हांला भूमिका घ्यावी लागायची. आता मात्र वेगळी परिस्थिती आहे. आम्ही काँग्रेसपेक्षा मोठा भाऊ आहोत. काँग्रेसच्या ४४ जागा आहेत तर आमच्या ५४ आहेत. हे असं गणित आहे. (Latest Marathi News)

...तर ठाकरे गट तीन नंबरचा पक्ष- चव्हाण

आज सोलापूरमध्ये बोलतांना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, हे विधान चुकीचं नाही. आता ठाकरे गटात फक्त १६ आमदार उरले आहेत.

प्रत्येक पक्षाचे नेते उत्साहवर्धक स्टेटमेट करत असतात, त्यात गैर काही नाही. राष्ट्रवादी एक असेल तर काँग्रेस दोन नंबरचा आणि उद्धव ठाकरे गट तीन नंबरचा पक्ष आहे. यात चुकीचं काही नाही.A

दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडी तुटू नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. एकूणच तिन्ही पक्षांकडून एक प्रकारचं प्रेशन बनवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT