Shivaji Maharaj
Shivaji Maharaj 
महाराष्ट्र

'नवपेशवाईत पुन्हा शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भाजप-शिवसेना सरकारच्या काळात म्हणजे नवपेशवाईत पुन्हा शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रा जागा हो, असे आवाहन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केले आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत जनमनांतील अस्मिता तेवत ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा पदोपदी गजर होतो, मात्र महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आला आहे. यावर राज्यातील नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सावंत यांनी ट्विट करत म्हटले आहे, की महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढेपर्यंत पेशवाईच्या काळात महाराजांचा इतिहास पुसून टाकण्यात आला होता. ज्योतिबांनी शिवरायांना कुळवाडीभूषण उपाधी दिली. नवपेशवाईत पुन्हा शिवरायांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT