Yogesh Soman 
महाराष्ट्र बातम्या

शिक्षण व्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी सोमणांवरील कारवाई योग्यच : सावंत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला वेठीस धरण्यात आले होते. अननुभवी, अकार्यक्षम आणि अपात्र लोकांची केवळ संघ विचारधारेचे असल्याने महत्वाच्या पदांवरती नेमणूक करुन शिक्षण व्यवस्थेचे संघीकरण करण्याचा भाजपा सरकारचा डाव असतो. योगेश सोमण यांच्यावर झालेली कारवाई ही असहिष्णुता नव्हे तर शिक्षण व्यवस्थेचे शुद्धीकरण आहे, असे उत्तर भाजपाच्या टीकेला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले आहे.

सावंत म्हणाले, "योगेश सोमण ही व्यक्ती, त्यांनी स्वतःच जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांना शिकवण्याचा कोणताही अनुभव नाही, नाट्यशास्त्र विभागाची कोणतीही पदवी यांनी घेतलेली नाही. ते राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी होते, असे असतानाही काही योग्य आणि पात्र व्यक्तींना डावलून सोमण यांची मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर बसून ते भाजपचा व संघाचा प्रचारच करत होते आणि शिक्षणव्यवस्थेचे संघीकरण करण्याच्या मोठ्या कारस्थानाचा एक भाग होते. इतर अनेक महत्त्वाच्या पदावर नियुक्त केलेल्या संघाच्या लोकांप्रमाणेच सोमण यांचा राजकीय उपयोग भाजप करुन घेत होता आणि त्यांची राजकीय विधाने ही याच कार्यपद्धतीचा भाग होती.''

सावंत पुढे म्हणाले, ''सरकारी पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने राजकीय मते मांडू नये किंवा राजकीय पक्षांशी जवळीक असू नये असे महाराष्ट्र नागरी सेवा नियमांवलीनुसार उल्लेखीत आहे. असे असतानाही बेफामपणे सोमण हे अशापद्धतीची विधाने करु शकले, याचे कारण भाजप सरकारचे त्यांना संरक्षण होते. याचकारणाने आशिष शेलारांसारखे भाजप नेते योगेश सोमण यांच्यावर झालेल्या कारवाईला असहिष्णुता म्हणून उर बडवत आहेत. खऱ्या अर्थाने एनएसयुआयने केलेले आंदोलन हे लोकशाही आणि शिक्षणव्यवस्था वाचवण्यासाठी होते आणि सोमण यांच्यावर केलेली कारवाई ही शिक्षणव्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी होती,''

गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये संघ विचारधारेच्या अपात्र, अननुभवी, अयोग्य व्यक्तींच्या केवळ संघ विचारधारेचे असल्याने महत्वाच्या पदांवर झालेल्या नियुक्‍त्या या रद्द करुन योग्य आणि पात्र व्यक्तींना त्या पदांवर नेमणे हे शिक्षणव्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी आवश्‍यक आहे. मुंबई विद्यापीठाची दुरवस्था अशाच लोकांमुळे झालेली आहे, असेही सावंत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT