CM Uddhav Thackeray Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्याच्या 'त्या' भूमिकेविरोधात काँग्रेस नेत्याचं थेट राज्यपालांना पत्र

साकीनाका बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केलं होतं विधान

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबईतील साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन सध्या राज्याचं राजकारण तापलेलं आहे. या हत्या प्रकरणाची दिल्लीतील निर्भया प्रकरणाशी तुलना करण्यात आली आहे. दरम्यान, मुखमंत्र्यांनी याप्रकरणी परप्रांतियांविरोधात प्रतिक्रिया दिली होती. याचा विरोध करताना मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस विश्वबंधू रॉय यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिलं आहे. अमर उजालाने याबाबत वृत्त दिलं आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परप्रांतियांना जबाबदार धरलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस नेते विश्वबंधू रॉय नाराज झाले आहेत. याविरोधात त्यांनी थेट राज्यपालांना पत्र लिहिलं असून यामध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या या भूमिकेवर टीका केली आहे.

रॉय यांनी आपल्या पत्रात म्हटलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका प्रादेशिक पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या प्रदेशाची चिंता आहे. ठाकरे यांनी या प्रकरणी इतर राज्यांतील नागरिकांना जबाबदार धरलं आहे. आपल्या वोट बँकेला संतुष्ट करण्यासाठीच त्यांनी असं विधान केलं आहे.

यापूर्वीही शिवसेनेविरोधात पक्षश्रेष्ठींकडे केली होती तक्रार

काँग्रेस नेते विश्वबंधू रॉय यांनी यापूर्वीही शिवसेनेला टार्गेट केले होते. याच वर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून शिवसेनेविरोधात तक्रार केली होती. शिवसेना नेत्यांचं घोटाळ्यांमध्ये नाव येत असल्यानं त्याचा काँग्रेसला धोका असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच सरकारमधील नवा घोटाळा कधीही बाहेर येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप करत सरकारमधील ही आघाडी पुढे काँग्रेससाठी धोक्याची ठरु शकते असंही त्यांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT