Congress Esakal
महाराष्ट्र बातम्या

Congress: काँग्रेस नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांची घेतली भेट, विरोधी पक्षनेते पदाबाबत नार्वेकरांनी दिले आश्वासन

काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेस नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांची घेतली भेट

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सुमारे चार वर्षांनंतर काँग्रेसकडे चालून आले आहे. या पदासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे न जाणाऱ्या नेत्याच्या शोधात पक्षश्रेष्ठी होते. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे तीन नेत्यांची नावे चर्चेत असताना काल विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

त्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा आज विधानभवनच्या कामकाजात करण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र विधानभवनच्या कामकाजात विरोधी पक्षेनेते पदाबाबतचा घोषणेबाबतच्या कामकाजाचा उल्लेख नसल्याची बाब निदर्शनास येताच काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अध्यक्षांची भेट घेतली आहे. त्यानुसार विरोधी पक्षनेते पदी विजय वडे्टीवार यांचा नावाची घोषणा आज दुपारपर्यंत होण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी याबाबत आश्वासन दिल्याची माहिती काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन वडेट्टीवार यांच्या नियुक्तीबाबतचे पत्र दिले.

त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीबाबतचे पत्र मला काँग्रसेने दिलं आहे. पण त्यावर संविधान तरतुदींचा विचार करून निर्णय घेऊ असे अध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नवा विरोधी पक्षनेता कोण असेल असा प्रश्न निर्माण झाला होता. जास्त संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला होता. त्यानुसार काल विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik: रिक्षा चालकांनी मदत नाकारली, आईच्या खांद्यावर लेकराने जीव सोडला; भाजपचा पदाधिकारी धावला, पण..

Solapur AkashKandil: कागदी आणि प्लास्टिक कंदील विसरा! सोलापुरात मिळतोय खास मातीचा आकाश कंदील, जाणून घ्या किंमत किती?

OMG! फक्त ५ लाखांची लोकसंख्या असलेला देश खेळणार FIFA फुटबॉल वर्ल्ड कप

Passenger bus caught fire : भीषण दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस पेटली; लहान मुलं, महिलांसह १५ जणांचा मृत्यू

Thane News: परप्रांतीयांची मुजोरी वाढली! दिवाळीचा स्टॉल लावण्यावरून वाद पेटला, अमराठी महिलांचं मराठी महिलांसोबत नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT