congress leaders working out and practicing jogging bharat jodo yatra in maharashtra  
महाराष्ट्र बातम्या

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींसोबत चालण्यासाठी राज्यातील नेत्यांची 'कसरत'! लक्ष्य 382 किमी

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेच्या स्वागताच्या तयारीत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सध्या व्यस्त आहेत. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाचे कार्यकर्ते मराठवाडा आणि विदर्भातील यात्रेत सहभागी होणार आहेत. राज्यातील नेते यात्रेच्या तयारीत व्यस्त असताना राहुल गांधीसोबत पायी चालण्यासाठी देखील कॉंग्रेसच्या नेत्यांकडून विशेष तयारी केली जाते.

कॉंग्रेसच्या या यात्रेत पक्षाचे नेते राहुल गांधी हे दिवसाला पंचवीस किमी चालत असल्याने या यात्रेत चालण्यासाठी, स्टमीना टिकवण्यासाठी कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील नेते व्यायाम करत आहेत. राहुल गांधी यांचा फिटनेस पाहाता राज्यातील इतर नेत्यांना त्यांच्यासोबत चालण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे दररोज चालण्याची प्रॅक्टिस करत आहेत. तसेच सतेज पाटील, यशोमती ठाकूर, नितीन राऊत देखील विशेष मेहनत घेतान दिसत आहेत.

नॅशनल फुटबॉल खेळाडू असलेले विश्वजित कदम नेहमीच जॉगिंग करतात, भारत जोडो यात्रेसाठी कदम हे देखील आता सहा किमी जॉगिंग दररोज करत आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील नेहमीच व्यायाम करत असतात, त्यामुळे त्यांची पण तयारी जोरात सुरू आहे. भारत जोडो यात्रेत तयारीच्या जबाबदारी सोबत या यात्रेत चालण्यासाठी देखील नेते आतापासून मेहनत घेताना दिसत आहेत.

दरम्यान भारत जोडो यात्रा 7 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रात असेल आणि 382 किमीचा प्रवास असेल. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, जामोद या भागातून ती जाईल. नंतर ते मध्य प्रदेशच्या दिशेने जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT