congress mla kailash gorantyal dialogue for rebel shivsena mla like shahaji bapu patil style  
महाराष्ट्र बातम्या

काँग्रेसनं बंडखोर आमदारांना शहाजी पाटील स्टाईलनं डिवचलं; म्हणे, ५० खोके...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदें आणि फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने पहिली शर्यत जिंकली असन विधानसभेच्या अध्यक्षपदी त्यांच्या गटाचे राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आहे. आता उद्या शिंदे-फडणवीस सरकार बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. यादरम्यान काँग्रेसचे आमदात कैलास गोरंट्याल यांच्या एका डायलॉगची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

काही दिवसांपुर्वी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा गुवाहटातून कार्यकर्ताला फोन बोलतानाचा एक डायलॉग चांगलाच व्हायरल झाला होता. त्याच पार्श्वभूमिवर गोरंट्याल याचा हा डायलॉग चर्चिला जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ३९ आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली. या बंडखोर आमदारांसोबत त्यांनी आधी सूरत आणि नंतर थेट गुवाहाटी गाठलं. गुवाहाटीत हॉटेलातील वास्तव्याला असताना शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये ते काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल, अशा शब्दांत गुवाहाटीच्या वातावरणाचे वर्णन करत होते. त्यावरून आता गोरंट्याल यांनी जोरदार टोला लगावला आहे, ते म्हणात आहेतकी, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल.. ओक्के? ५० खोके पक्के..

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत सर्वप्रथम भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी नार्वेकरांच्या बाजूनं मतदान केलं. यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी राजन साळवी यांच्यासाठी मतदान केलं. दरम्यान आज झालेल्या या मतदानाच्या वेळी काँग्रेसचे आमदार कैलास गोरट्याल नाव घेताना शेर म्हणत "ऐसे कैसे कैसे होगे, कैसे कैसे ऐसे हो गये" म्हणत मतदान केलं. तर ऑडियो क्लीपमुळे गाजलेले शहाजीबापू पाटील मतदान करण्यासाठी ज्यावेळी उभे राहिले त्यावेळी इतर सदस्यांनी एकच गोंधळ केला. , "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील" म्हणत इतर सदस्यांनी मतदान सुरू घोषणाबाजी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT