Congress MLA Sangram Thopte met BJP leader Devendra Fadnavis Maharashtra Politics  
महाराष्ट्र बातम्या

सेनेनंतर आता कॉंग्रेसमध्ये फूट? आमदार संग्राम थोपटे फडणवीसांच्या भेटीला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेच्या अनेक आमदार-खासदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील माहाविकास आघाडी सरकर कोसळलं. दरम्यान शिवसेनेत झालेल्या या बंडखोरीनंतर आता कॉंग्रेसला देखील खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे. कारण कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर राज्यात शिवसेनेनंतर आता कॉंग्रेसचे आमदार फुटणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

दोन महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे गटातील ४० आमदार फुटले आणि राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर महाराष्ट्रात कॉंग्रेसमध्ये देखील अस्वस्थता दिसून येत होती, बहुमताच्या चाचणीवेळी देखील कॉंग्रेसचे आमदार सभागृहाच्या बाहेर राहिले होते. तेव्हापासून कॉंग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत काय असे बोलले जात होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अस्लम शेख यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

दरम्यान आता संग्राम थोपटे यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे. सागर बंगल्यावर त्यांची फडणवीसांसोबत गुप्त बैठक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान या भेटीमुळे कॉंग्रेमध्ये देखील बंडखोरी होणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT