Ashok Chavan
Ashok Chavan 
महाराष्ट्र

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात: अशोक चव्हाण

सकाळवृत्तसेवा

अमरावती : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून, आघाडीसाठी काँग्रेस सकारात्मक आहे. तसेच मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आघाडीचे चित्र अधिक स्पष्ट होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
विदर्भात काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला सुरवात झाली असून, आज (बुधवार) ही यात्रा अमरावतीमध्ये पोचली आहे. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्याने काँग्रेस पक्षाचे सर्व  ज्येष्ठ नेते अमरावतीत दाखल झाले आहेत.  

अशोक चव्हाण म्हणाले, की प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आमची बोलणी सुरु आहे. मात्र एमआयएम हा आमच्यासाठी अडचणीचा मुद्दा असल्याने त्यांना आघाडीमध्ये घेणार नाही. राज्यात पडलेल्या दुष्काळासंदर्भात केंद्राची टीम सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहे. या संदर्भात केंद्राचा राज्य सरकारवर विश्वास नाही. हा पाहणी दौरा हा केवळ फार्स आहे. 

आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस नेतृत्वाला हैराण करणे हा एकमेव उद्योग सध्या भाजप करीत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी नॅशनल हेरॉल्डसह अनेक प्रकरणं उकरून काढली जात आहेत, तर नेत्यांचे फोन टॅप करण्यासारखे प्रकार देखील केल्या जात आहेत तर सर्व संवैधानिक संस्था आज अडचणीत असल्याचेही ते म्हणाले. 

भाजप वाल्यांच कुत्रं तरी मेल का?
महात्मा गांधींचे नाव घेण्याचे काम भाजप करत आहे. महात्मा गांधीचे नाव घेण्याचा अधिकार भाजपल्यांना अजिबात नाही. काँग्रेसने महात्मा गांधींच्या अहिंसेचे मार्गातून इंग्रजांना पिटाळून लावले. जनसमुदाय एकत्र करून आंदोलन उभे केले. हे काम करतात अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी बलिदान दिले. या भाजप वाल्याच कुठलं योगदान आहे. यांच्या घरच एक कुत्रं मेल म्हणून योगदान आहे का म्हणत चांगलीच बोचरी टीका अशोक चव्हाण यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT