Nana Patole 
महाराष्ट्र बातम्या

'त्या' व्हिडीओबाबत नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हायरल व्हिडीओ ट्वीट करत कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांना काय नाना... तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीत… असा सवाल केला होता. यानंतर कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. (Congress Nana Patole on viral video)

चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्वीट करत थेट केला होता यावर बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, हे सगळं प्रकरण आमची लिगल टीप पाहात आहे, मी सध्या पूराच्या दौऱ्यामध्ये आहे, राजकारणाची पातळी खाली उतरली आहे त्याचा हा परिणाम आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याची प्रक्रीया सुरू आहे. आमची लिगल टीम यावर काम करत आहे असे पटोले म्हणाले आहेत. मला त्या ताईंबद्दल काही बोलायचं नाही. आमच्या प्रकरणामध्ये काय घडलंय ते आमची लिगल टीम पाहते आहे. त्यामुळे खरं काय ते समोर येईल, असे नाना पटोले म्हणाले.

या व्हायरल व्हिडीओबाबत चित्रा वाघ यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद घेततली होती, या मध्ये बोलताना लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक जीवनात वावरत असताना काळजी घ्यायला हवी. नाना पटोले यांचा व्हिडीओ पाहून मला धक्का बसला. माझ्याकडे तो व्हिडीओ आल्यावर मी प्रश्न उपस्थित केला. तसेच राज्यात काही घडलं की आम्हाला प्रश्न विचारण्यात येतो. मग मीही नानांना पटोलेंना प्रश्न विचारल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT