Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना,राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली - नाना पटोले

नामदेव कुंभार

स्वबळाच्या घोषणेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला असून लोणावळा येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोपही यावेळी पटोले यांनी केला.

सोनिया गांधी यांनी सांगितलेय आहे की, महाराष्ट्र काँग्रेसची भूमी आहे. आपल्याला तिथं सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे. परंतु मला हे सुखानं जगू देणार नाहीत. त्यांच्याकडे गृहखातं आहे मुख्यमंत्रिपद आहे. ते सत्तेत आपल्याबरोबर आहेत. परंतु ते त्यांच्या जवळ आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहतेय, हे त्यांना माहित आहे. आता मी इथं आहे याचा रिपोर्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना देण्याचा आदेश आहे. मी कुठं सभा घेतली, कुठले दौरे केली याची सगळी माहिती असते, असं पेटोले म्हणाले आहेत.

‘स्वबळावर लढू, असे स्पष्ट करत स्वबळाची भाषा मी केली तर त्रास होतो, आणि ‘ते’ बोलले तर ठीक, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेला लगावत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,’’ असे आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. तसेच लोणावळामधील चिक्की ही फार प्रसिद्ध आहे. मात्र, फडणवीस सरकारने या ‘चिक्कीला’ फेमस केले. पण, आता या ‘चिक्की’ चे काय हाल चालू आहे ते बघा, असा टोला त्यांनी पंकजा मुंडे यांना लगावला.

‘‘कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास होत असेल, कामे होत नसतील तर या त्रासाला तुम्ही आपली ताकद बनवा,’’ असे पटोले म्हणाले. आपला पक्ष मोठा करणे, पुढे नेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. व्यवस्थेच्या विरोधात लोकांचा उद्रेक आहे. तो मला माहिती आहे. कुणाकडे लक्ष देण्याची गरज नाही, आपण आपल्या घराकडे लक्ष द्या, घर मजबूत करा, असा सल्ला यावेळी पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला.

बारामतीमध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. तिथे मला प्लॅनिंग करावे लागेल. मोठ्या जहाजांना लवकर बुडण्याची भीती असते. लहान होडी इकडून तिकडे लवकर निघून जाते. माझा इशारा तुम्ही समजून घ्या. बारामतीसाठी मला प्लॅनिंग करावे लागेल, असा खोचक टोला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT