Congress News 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात होणार राजकीय भूकंप? राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये होणार मोठे प्रवेश, पटोलेंनी दिले संकेत

Sandip Kapde

Congress News: काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज (मंगळवार) भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि त्यांना आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार म्हटले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अजय माकन आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी येथील शांती वन येथील नेहरूंच्या स्मारकाला भेट देऊन त्यांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले देखील उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले, "आज केसी वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांची भेट घेतली. नेहरू जयंती कार्यक्रमाला मी आलो होतो. ५ राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. याबाबत आज चर्चा झाली. आमची जोरदार तयारी झाली आहे. तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस पक्षात मोठे प्रवेश होणार आहेत. यासाठी राहुल गांधी यांचा वेळ घेत आहोत. हे प्रवेश कुणाचे आहेत. हे तुम्हाला लवकर कळेल."

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची आशिष शेलार यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती. यावर नाना पटोले यांना प्रश्न विचारला तर त्यांनी यावर बोलायला नकार दिला. नाना पटोले म्हणाले, कोण काय वक्तव्य करतय यावर आमचं लक्ष नाही. राज्यात अनेक मोठ्या समस्या आहेत. राज्य सुसाईड केंद्र झाल आहे का असा प्रश्न पडतो. राज्यातून मोठे उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. ही परिस्थिती भयावह आहे.

राज्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. ओल्या दुष्काळाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. शेतकरी अडचणीत असून शिवाजी महाराजांच्या राज्यात सगळ उलट होत आहे, सगळ लुटून सुरतला दिले जात असल्याचे नाना पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT