congress sachin sawant attack on kirit somaiya criticize bjp leader kirit somaiya injury  Sakal
महाराष्ट्र बातम्या

"किरीट सोमय्या नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू इच्छित आहेत"

सकाळ डिजिटल टीम

राज्यात मागच्या काही दिवसांपासून हनुमान चालिसा पठण प्रकरणी राजकारण खूपच तापलेले आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका घेतल्याचे पडसाद सर्वत्र उमटले यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा प्रकार झाला, दरम्यान किरीट सोमय्या हे नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू इच्छित असल्याचे खोचक टीका काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केलीय.

किरीट सोमय्या यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यात किरीट सोमय्या यांच्या चेहऱ्यावर जखमी झाली होती. मात्र या जखमेबाबतच काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करून सोमय्यांवर हल्ला चढवला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहीलं आहे की, डॉक्टरांनुसार 0.5 cm x 0.1 cm x 0.1 cm चा ठिपका चेहेऱ्यावर आला. तो आणला गेला का? हे चौकशीअंती स्पष्ट होईलच पण २ दिवसांत बँडेज गायब झाले तसा आता तो दिसेनासाही झाला. या नौटंकीने महाराष्ट्राचे राजकारण गढूळ होत आहे असे त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय झालं?

मुंबई पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना शनिवारी अटक केली होती. त्यांना भेटण्यासाठी सोमय्या खार पोलीस ठाण्यात गेले असताना शिवसैनिकांनी दगडफेक करत हल्ला केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. दरम्यान आता सोमय्यांनी या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय गृहमंत्रालयाला लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात भाजपच्या आमादारांचं शिष्टमंडळ गृहसचिवांना भेट घेणार असून या घटनेची माहिती देत लक्ष घालण्याची विनंती करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT