Sachin-Sawant 
महाराष्ट्र बातम्या

'स्वतःची लाईन वाढत नाही तर दुसऱ्याची कमी करण्याची मोदींची मानसिकता'

विनायक होगाडे

मुंबई: राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. आता या पुरस्काराला हॉकीचा जादुगार समजल्या जाणाऱ्या आणि देशाला हॉकीमध्ये नावलौकिक मिळवून दिलेल्या 'मेजर ध्यानचंद' यांचे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून याची माहिती दिली आहे. यावर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटंलय की, राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न होत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव कोणत्याही ठिकाणी व पुरस्काराला देण्याचे स्वागतच आहे. त्यांच्या नावाने सर्वोत्तम खेळ पुरस्कार २००२ पासून आधी आहेच. दुर्दैवाने मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले आहे.

पुढे ते म्हणाले की, शहीद राजीव गांधी हे देशाचे सुपुत्र व हिरो होते. त्यामुळे मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी राजीवजींचे स्थान हलणार नाही. स्वतःची लाईन वाढत नाही तर दुसऱ्याची कमी करणे ही मोदींची मानसिकता आहे. तरीही जर खेळाडूंचे नाव देण्याची तात्विक भूमिका असेल तर मोदी व जेटली यांच्या नाव ज्या स्टेडियमना दिले आहे ते बदलून दिग्गज खेळाडूंचे नाव देण्याची सुरुवात करा. सरदार पटेलांचे नाव छोटं करुन हयातीतच स्वतःचे नाव स्टेडियमला देणारे मोदी निश्चितपणे याचा विचार करतील ही अपेक्षा, अशी कडवी टीका त्यांनी केली आहे. पुढे त्यांनी 'मेजर ध्यानचंद अमर रहे!', 'राजीव गांधी अमर रहे!' असंही म्हटलं आहे.

खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असं करण्यात आलं आहे. लोकांच्या भावनांचा आदर राखून हा निर्णय़ घेण्यात आला असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. आणखी एक ट्विट करताना त्यांनी म्हटलं की, ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीने आपली छाती अभिमानाने भरून आली आहे. विशेषता हॉकी संघाच्या कामगिरीने विजयासाठी केलेला संघर्ष आणि कष्ट सध्याच्या तसंच भविष्यातील तरुणांसाठी मोठी प्रेरणा असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT